भुशी डॅम मध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू, पण स्थानिकांच्या टपऱ्या,दुकानावर संयुक्तिक कारवाईचा बुलडोझर,त्यांचा रोजगाराचे काय ?



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मावळ तालुक्यामध्ये दिनांक ३०/०६/२०२४ रोजी लोणावळ्यातील भूशी धरणाच्या वरच्या बाजूला आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पर्यटकांपैकी एकाच कुटुंबातील ५ जणांचा पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २ जुलै २०२४ ला सकाळी ८ वाजल्यापासून भुशी धरण परिसरातील स्थानिकांचा दुकानें,टपऱ्या उध्वस्त करण्याची रेल्वे विभाग, वन विभाग, लोणावळा शहर पोलीस,लोणावळा नगरपरिषद यांची संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांचा जुलै तें ऑगस्ट या दोन महिन्यावरच वर्षभराची रोजगारी अवलंबून असल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भुशी च्या मागच्या भागात दुर्घटना घडली त्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी असली तरी रेल्वे प्रशासन वन विभागाने याआधी सुरक्षेचे उपाय योजले असते तर ५ दुर्दैवी जणांचा जीव गेला नसता. लोणावळा आणि त्यातल्या त्यात भुशी डॅम हे पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण असल्याने येथे लाखो पर्यटक येत असतात. त्यांच्या वरच स्थानिक तरुण रोजगारांचे पोटापाण्याचा प्रश्न सुटत असतो. परंतु संबंधित विभागाने स्थानिक दुकान, टपरीधारकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता थेट बुलडोझर फिरवल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भुशी डॅम ओव्हर फ्लो झाले आणि दुसऱ्या दिवशी सदर दुर्दैवी घटना घडली आणि लगेच थेट कारवाई झाल्याने कर्ज काढून टपऱ्या दुकानें आणि माल भरल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचा चुकीची शिक्षा स्थानिकाना देणे किती संयुक्तिक असा प्रश्न सामान्य विचारात आहेत. त्यांच्या टपऱ्या दुकानं यावर बुलडोझर फिरवून अपघात थांबणार का असा प्रश्न स्थानिक नागरिक बेरोजगार झालेत तें करत आहेत. लोणावळ्यातील सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील ३ छोटे धबधबे, भूशी डॅम, भूशी डंग येथील रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊस वरचा भाग,भूशी डेंग येथील वेस्ट वेइरच्या डाव्या बाजूचा वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पॉईट, शिवलिंग पॉइंट इत्यादी ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. पर्यटन स्थळ असल्याने येथे कोणती मोठी इंडस्ट्रीज नाहीत त्यामुळे रिक्षा,हॉटेल,छोट्या टपऱ्या यावरच स्थानिक नागरिकांची उपजीविका चालते त्यामुळे त्यांचा पुढे मोठा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.




