प्रदर्शनात श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची भक्तांना भुरळ


मावळ मराठा न्युज :-पुणे ( प्रतिनिधी) मेक माय मंदिर या मंदिर रचना करणाऱ्या स्टार्टअप च्या वतीने येरवडा येथे ईशान्य मॉलमध्ये भरवण्यात आलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बनवलेल्या श्रीराम मंदिर प्रतिकृतीला नागरिकांनी पसंती दिली. या प्रदर्शनाचा प्रतिकृती एक आकर्षण बिंदू बनला. यावेळी मेक माय मंदिरचे संचालक निलेश मेहता म्हणाले की, अयोध्येमध्ये साकारलेल्या दिनांक २२ रोजी भव्य श्रीराम मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. राम मंदिर उभारणी ही देशासाठी अभिमानाची व अस्मितेची बाब आहे. ही घटना तब्बल ५०० वर्षानंतर घडत आहे त्याची प्रेरणा घेऊन आम्ही कोरियन मटेरियल सॉलिड सरफेस पासून बनवलेल्या श्रीराम मंदिराची मूर्ती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. या मंदिरामध्ये श्रीराम प्रभू सीतामाई,लक्ष्मण आणि राम भक्त हनुमान यांचे मूर्ती मंदिरात पाहायला मिळतात. शिवाय लाकूड,सॉलीड सरफेस, मेटल, स्टेनलेस स्टील, पीव्हीडी गोल्ड या घटकांपासून या मंदिराची बांधणी केली आहे. हे मंदिर जलरोधक व अग्निरोधक असून बुरशी लागत नाही किंवा या मंदिराला तेल हळदी कुंकवाचे डाग लागले तरी सहज स्वच्छ करता येते. वजनाने हलके असल्यामुळे सुट्टे भाग जोडणी आणि सहज स्थलांतरित करू शकतो. लहानात लहान एक फुटापासून ते भव्य मंदिराची रचना आम्ही करून देऊ शकतो. भक्तांच्या त्यानुसार मूर्ती किंवा घरातील मंदिरे बनवून देतो. आमच्या प्रदर्शनाला सर्व जाती-धर्माचे नागरिक भेट देत आहे. शिवाय वास्तु विशारद डिझायनर हे मंदिराची प्रतिकृती बघतात त्यावेळेस त्या आश्चर्यचकित होतात. आणि अशा प्रकारची प्रतिकृती किंवा कलाकृती अद्याप आम्ही बघितलेली नसल्याचे सांगतात. घरातील मंदिराची उभारणी करताना वास्तुशास्त्र धर्मशास्त्रनुसार, कुलदैवत त्यांना जसे स्थान आहे धर्म परंपरेनुसार आम्ही फिटिंग करून देतो. मंदिर ही एखादी वस्तू नाही तर ती आपली अस्मिता आहे. अध्यात्म आणि धार्मिक रितीरिवाज आणि संस्कृतीशी जोडलेले आहे. त्यामुळे मूर्ती बसवताना किंवा मंदिर बसवताना घरातील व्यक्तींचे योगदान गरजेचे असते.देव्हाऱ्यातील देव एक घरातील आपण सदस्य प्रमाणे असतात. घरातील मंदिर हे बाजारातून रेडीमेड विकत न घेता ते शास्त्रशुध्द पध्दतीने बनवून स्थापन करायचे असते .या कार्यासाठी मेक माय मंदिरचे संचालक मनीष ओसवाल, निलेश मेहता, प्रणित मेहता यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे




