विविध संतांची वेशभूषा करून हातात भगवी पताका, टाळ” विठ्ठल गजरात दुमदुमली कलापिनी”


मावळ मराठा न्युज -तलेगाव,कलापिनी बाल भवन, कुमार भवन स्वास्थ्य या सर्वांची मिळून आषाढी दिंडी कलापीनीत उत्साहात संपन्न झाली. बालभवन ची मुले विविध संतांची वेशभूषा करून हातात भगवी पताका, टाळ, डोक्यावर तुळशी घेऊन वारकरी बनवून या दिंडीत सहभागी झाले होते. अयांश सोनपावले आणि राधा दाभाडे विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात अतिशय सुंदर दिसत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुजित मल्ली आरती मल्ली आणि संजय मालकर वंदना मालकर हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि पालखी पूजन झाले.बाल भवन ,बाल भवन पालकमंच, स्वास्थ्य योग या सर्वांनी आपापले रिंगण सादर केले.
कलापिनीतील दिंडीची ही परंपरा अशीच अखंड राहो अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करत सुजित यांनी मुलांचे कौतुक केले. संजय मालकर यांनी आपल्या वारीतील आठवणी सांगत बाल भवन च्या मुलांचे आणि आयोजकांचे कौतुक केले. विठुरायाची आरती करून नंतर सर्वांनी विठुरायाच्या आणि माऊलींच्या गजरात पालखी प्रदक्षिणा केली.
या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे ,उपाध्यक्ष अशोक बकरे कार्यकारणी सदस्य विनायक भालेराव ,आणि लीना परगी उपस्थित होते .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिरा कोन्नुर यांनी केले.बालभवन प्रमुख मधुवंती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशिक्षिकांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page