आगामी येणाऱ्या २०२४ च्या मावळ लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कंबर कसली, संजोगवाघेरे असणार उमेदवार?




मावळ मराठा न्युज :-लोणावळा,आगामी येणाऱ्या २०२४ च्या मावळ लोकसभा, विधानसभा,नगरपालीका व तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका संदर्भात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आमदार रविंद्रजी मिर्लेकर व,शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली , मा.आमदार शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा.गौतम चाबुकस्वार,शिवसेना संपर्कप्रमुख मावळ तालुका मा.प्रभाकर पवार,महिला आघाडी संपर्क संघटिका मावळ व पिंपरी -चिंचवड लतिका पाष्टे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हॉटेल चंद्रलोक लोणावळा येथे नुकताच शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी श्री.संजोग भाऊ वाघेरे यांची शिवसेना मावळ लोकसभा संघटक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेना मावळ तालुका व लोणावळा शहराच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिवसेना मावळ तालुक्यातील पदाधिकारी महिला आघाडी व लोणावळा शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी नगरसेवक,नगरसेविका शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




