कुसगाव बुद्रुक येथील वार्ड क्रमांक ६ मधील दत्तवाडी ते कुसगाव रस्त्यावर पूलसाठी ९६ लाख निधी मंजूर


मावळ मराठा न्युज:- कुसगाव,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लेखाशीर्ष बांधकाम अंतर्गत कुसगाव बुद्रुक येथील वार्ड क्रमांक ६ मधील दत्तवाडी ते कुसगाव रस्त्यावर पूल साठी ९६ लाख निधी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबददल कुसगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे पंचायत समिती सदस्य संतोष राऊत, हरीश कोकरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन मोरे, प्रदीप कोकरे, विशाल तिडके,जयराम भोसले,नितीन साळवे संजय गुंड,रवी कालेकर,संगीता गायकवाड,संध्या चौधरी यांच्याकडून आभार मानले. सदर विषय हा नागपूर अधिवेशनात मांडण्यात आला होता त्या केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.




