लोणावळा शहरातील नागरिक समस्यांचे तात्काळ निवारण करण्याची पालिका,पोलीस प्रशासनाला शिवशाही व्यापारी संघाची मागणी




मावळ मराठा न्युज-लोणावळा,प्रतिनीधी, शिवशाही व्यापारी संघाची मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद व पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर यांच्याकडे विविध नागरी समस्या संधर्भात निवेदनद्वारे मागणी करण्यात आली. लोनावळा व खंडाळा शहरातील विविध नागरी व पर्यटकांशी संबंधित समस्या लक्षात घेऊन शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने मुख्याधिकारी – लोणावळा नगरपरिषद व पोलीस निरीक्षक – लोणावळा शहर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रमुखतः पावसाळ्यात पर्यटनस्थळे (पॉईंट्स) बंद न करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळू शकेल. तसेच वाहतूक सुरळीत ठेवणे, धोकादायक झाडांची छाटणी, ट्रॅफिक नियंत्रणासाठी होमगार्डची नियुक्ती, रस्त्यांची डागडुजी, उघडी गटारे स्वच्छ करणे, पे अँड पार्क व वन वे व्यवस्था पुन्हा सुरू करणे, अपघात रोखण्यासाठी कडक कारवाई आणि वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे – अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. शहराच्या सुरक्षितता व सुव्यवस्थेसाठी संघाने त्वरित कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. हे निवेदन देत असताना कृष्णा वसंत साबळे- अध्यक्ष मावळ लोकसभा मतदार संघ, सुधीर भाऊ राईलकर- शहरप्रमुख – महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज लोणावळा, रोहन लोखंडे- अध्यक्ष कायदेशीर सल्लागार, मावळ तालुका , बिपीन मंडलिक खंडाळा शहर प्रमुख- शिवशाही व्यापारी संघ, प्रसाद मंडलिक इ. मान्यवर उपस्थीत होते.




