संपर्क दवाखान्यात रुचिका क्लब मुंबई व संपर्क संस्था आयोजित आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद




मावळ मराठा न्युज :-मळवली,मोफत डोळ्यांची तपासणी,कान, नाक घसा तपासणी तसेच स्त्री रोग तपासणी करिता आसपासच्या गावांसाह खेड तालुका तसेच जुन्नर तालुक्यातून आलेल्या रुग्णानी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरामध्ये रुग्णांना रुचिका क्लब मुंबईच्या वतीने मोफत चष्मे वाटप मोफत औषधे वाटप तसेच अलपोहाराची व्यवस्था करण्यात आली होती रुचिका क्लब च्या वतीने रुग्णांना भेट स्वरूपात ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.दोन दिवसीय आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगीसंपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, रुचिका क्लब च्या व संपर्क संस्थेच्या विश्वस्थ किरण आर्या संपर्क संस्थेचे विश्वस्त किरण हुलावले, रुचिका क्लब च्या आशा झुंजूनवाला,ज्योती राजन, सुमित्राजी,संपर्क चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग, कृष्णा सातार्डेकर, हे ह भ प तुषार महाराज दळवी, श्रीनाथ लांडेडॉ गिरी बालाजी, डॉ अमोल शिंदे, तसेच एच व्ही देसाई रुग्णालयाचे डॉक्टर व सहकारी आदिजन उपस्तिथ होतेसंस्थेच्या वतीने अमितकुमार बॅनर्जी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक अमितकुमार बॅनर्जी यांनी केले.यावेळी उपस्तिथ वयोवृद्ध रुग्ण लक्ष्मी राऊत यांनी आईच्या प्रेमावर आधारीत कविता सादर करून सर्वाना मंत्रमुग्ध केले त्यांचा सन्मान व उपस्तिथ डॉक्टरांचा सन्मान रुचिका क्लब च्या सदस्यांनी केलायावेळी डोळे तपासणी करिता ९३६ रुग्णानी लाभ घेतला तर ८३५ रुग्णांना मोफत चष्मे वाटप व औषधे देण्यात आली४६४ लोकांची कान नाक घसा तपासणी करण्यात आली यावेळी २१५ रुग्णांना मोफत कानाच्या मशीन देण्यात आल्या तर १८० स्त्री रोग तपासणी करण्यात आलीसदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी संपर्क दवाखाना येथील डॉक्टर परिचारिका तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रमकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जण संपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर यांनी केले तर आभार ह भ. प. तुषार महाराज दळवी यांनी मानले




