सकल मातंग समाजाच्या पाठपुराव्याने निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे बी आर टी बस टर्मिनलचा नामफलक त्वरित दुरूस्त

मावळ मराठा न्युज :-पिंपरी,प्रतिनिधी,सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर समन्वयकांच्या पाठपुराव्याला यश आले.साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे बी आर टी बस टर्मिनलच्या नामफलकाची तात्काळ मुख्य व्यवस्थापक प्रमोद आंबासे यांनी दुरूस्तीचे आदेश दिले.नामफलक दुरूस्त कण्यात आला. बी आर टीचे मुख्य व्यवस्थापक प्रमोद ओबांसे व त्यांच्या प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानन्यात आले.हा पाठपुरावा सकल मातंग समाज समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, प्रदेश समन्वयक युवराज दाखले, सतिष भवाळ, सुनिल भिसे,आण्णासाहेब कसबे,रामदास कांबळे,राजु चव्हाण, आबासाहेब मांढरे,मंगेश डाखोरे, नानासाहेब कांबळे, गणेश कलवले, माणिक पौळ, उत्तम सकटे,मोहन भिसे,मिराताई अल्लाट, रेखाताई दुनघव, संगीताताई जाधव, आदी समाज बांधवांनी केला.दरम्यान सहकार्य करणाऱ्या पत्रकार बांधव,व पिंपरी चिंचवड महानगरपालिका बी आर टी प्रशासनाचे मनपूर्वक आभार सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने मानन्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page