रंगपंचमी ॐ चैतन्य श्री कानिफनाथ मंदिर मठ श्री कानिफनाथ उत्सव ३० मार्चला


मावळ मराठा न्युज :- लोणावळा,रंगपंचमी ॐ चैतन्य श्री कानिफनाथ मंदिर मठ, भुशी तलावामध्ये जागृत देवस्थान, सालाबाद प्रमाणे यंदाही श्री कानिफनाथ उत्सव रंगपंचमी शनिवार दिनांक ३०-०३-२०२४ रोजी मठात साजरा होणार आहे, तरी सर्व भाविक, माता, बंधू , भगिनी, कानिफनाथ गादीचे मालक, अस्थाना तसेच सर्व गावचे भजनी मंडळ ढोल- लेझीम सह येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सर्व सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तसेच लोणावळा नगरपालिकेचे मुख्यअधिकारी, उपमुख्यअधिकारी, प्रशासन व कामगार वृंद आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका पत्रकार बंधू-भगिनी, गणेश मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, शिवजयंती मंडळ व तमाम भाविकांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. विश्वस्तांनी उत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम योजिला आहे. तरी सर्व भाविकांनी तीर्थ प्रसाद व भंडाऱ्याचा लाभ घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण अध्यक्ष श्री. मोतीराम रावजी मराठे,मा. पोलीस पाटील, भुशीगाव,सेक्रेटरी श्री. माणिक मोतीराम मराठे.मा. नगरसेवक, लोणावळा नगरपरिषद व समस्त मराठे परिवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे आवाहन केले आहे.




