लोणावळा परिषदेच्या ढिसाळ आणि अकार्यक्षम कारभारा विरोधात सर्वे नं.५४/२ भुशी येथील मिळकत धारकांचे ७ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण

मावळ मराठा न्युज:- लोणावळा, गाव मौजे भुशी, ता. मावळ, जि. पुणे येथिल जमिन सर्वे नं. ५४/२ (सिटीएस नं. ६ व ७) येथे प्लॉट व घरे असून सदर प्लॉटसाठी लोणावळा नगरपरीषदेच्या मंजुर विकास योजनेत असलेला जाण्यायेण्याचा रस्ता आहे. सदर रस्ता २६ नोव्हेबर २०२१ पर्यंत रहदारीसाठी खुला होता. सर्व्हे नं. ५३ मधिल हकिम या बंगला मालकाने सदर रस्ता बंद केला. सदर रस्ता पुर्वीपासून “रेल्वे पाईपलाईन रोड” म्हणुन ओळखला जात होता. सदर रस्त्याच्या बाजुने रेल्वेची पाईपलाईन आजही आहे व ही मिळकत रेल्वे प्रशासनाच्या मालकीची आहे. या रस्त्यावर पुर्वीपासून सदर प्लॉटधारक व भुशी गाव येथिल ग्रामस्थ अनेक वर्षे वहिवाट करत होते. सदर मिळकतीमध्ये जाण्यायेण्या साठी पुर्वी रस्ता होता व हा रस्ता लोणावळा नगरपालिकेच्या मंजुर विकास आराखड्यात देखिल दिसत आहे व तसा लोणावळा नगरपरीषदेने झोन दाखला देखिल दिलेला आहे. परंतु ५४/२ (सिटीएस नं. ७) दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ मध्ये सदर प्लॉट व घर धारकांचा रस्ता डॉ. अविमय सोहराब हकिम या बंगला मालकांने बंद केला. सदर प्लॉट व घर धारकांना रहदारीसाठी रस्ता नसल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे.तसेच सर्व्हे नं. १५८ मधिल मिस्टी मिडो हॉटेल मालकाने रस्त्यावर अनधिकृत गेट व बांधकाम करुन सर्व्हे नं. ५४/२ (सिटीएस नं. ६) येथिल प्लॉट धारकांचा जाण्यायेण्याचा रस्ता बंद केला आहे. सदर हॉटेलच्या सीसी मध्ये हॉटेल मालकाने त्याच्या लगत असलेल्या प्लॉट धारकांना रस्ता ठेवणार असल्याचे सीसी मधिल पॅरा नं ७ मध्ये नमुद केलेले आहे. परंतु आज तागायत सदर हॉटेल मालक व लोणावळा नगरीपरीषदेकडे वारंवार पाठपुरावा करुन देखिल हा रस्ता खुला करुन देत नाही. सदर रस्त्याबाबत तक्रारदार यांनी मुख्यमंत्री, मंत्रालय मुंबई, नगररचना मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी पुणे, लोणावळा शहर पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी लोणावळा, आमदार सुनिल शेळके या सर्वांना पत्रव्यवहार व पाठपुरावा केलेला आहे. परंतु आज तागायत सदर रस्त्याबाबत कोणतीहि कारवाई करण्यात आलेली नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या या ढिसाळ व चालढकल धोरणविरोधात दिनांक ०७/०२/२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा येथे आमरण उपोषण करणार आहेत. तरी सदर लोणावळा नगरपरीषदेच्या मंजुर विकास आराखड्यात असलेला सर्वे नं. ५४/२ साठी असण-या जाण्यायेण्याच्या रस्त्यात केलेला अडथळा दुर करण्यासाठी लोणावळा नगरपरीषद योग्य ती कारवाई करत नसल्याने दिनांक ०७/०१/२०२४ पासून सदर मिळकत धारक छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा येथे आमरण उपोषण करणार आहोत. होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी लोणावळा नगरपरिषदेचीच असणार आहे असे अर्जदार मोहसिन फैजल संगे यांनी मावळ मराठा न्युज ला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page