लोणावळा महाविद्यालय,समता सेंटर फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार,विद्यार्थ्यांना मिळणार उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन

मावळ मराठा न्युज -लोणावळा, १५ एप्रिल २०२५ महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनाचे औचित्य साधून, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे, डॉ. बी.एन. पुरंदरे कला, श्रीमती. एस. जी. गुप्ता कॉमर्स, आणि श्रीमती. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयांमधील शिष्यवृत्ती विभाग व समता सेंटर ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील विविध संधी, अकरावी ते उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी सहकार्य व तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच कौशल्यविकास, नेतृत्वगुण विकसन यावर परिषदा व कार्यशाळेसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार अतिरिक्त दोन क्रेडिटचा लाभ मिळू शकणार आहे. या सामंजस्य करारावर लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुlख व समता सेंटर ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रवीण निकम यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे स्कॉलरशिप नोडल ऑफिसर डॉ. मल्हारी नागटिळक (सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना समता सेंटर ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशनच्या प्रतिनिधी वैशाली जाधव मॅडम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, स्कॉलरशिप नोडल ऑफिसर डॉ. मल्हारी नागटिळक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर काटकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. पवन शिनगारे, विद्यार्थी विकास कक्षाचे समन्वयक प्रा. संदीप लबडे, समान संधी कक्षाचे सदस्य डॉ. संदीप सोनटक्के, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पौर्णिमा गायकवाड मॅडम, प्रा. गणेश आखाडे हे उपस्थित होते. हा सामंजस्य करार करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र नय्यर, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, सचिव ॲड. नीलिमा खिरे, खजिनदार दत्तात्रय येवले व सर्व विश्वस्त व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना काय लाभ होणारलोणावळा आणि परिसरातील तसेच आजूबाजूच्या खेड्यातील गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी, तळागाळातील वंचित व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी या हेतूने ज्या विद्यार्थ्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी सहकार्य केले जाईल. थेट संवादाव्दारे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांविषयी जनजागृती करून, लवकरात लवकर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी सहकार्य केले जाईल. तसेच शासकीय कागदपत्रे नसल्याने व एखादी शासकीय योजना, स्कॉलरशिप व फेलोशिप माहिती नसल्याने होणारा गोंधळ व इतर समस्या कमी होतील. यातून कौशल्य विकासाच्या विविध संधीविषयीच्या वाटा खुल्या होतील. तसेच तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यास सरकारी योजना धोरणे व शिष्यवृत्ती इत्यादी गोष्टी, सामाजिक-भावनिक शिक्षण, उच्च शिक्षणातील संधी व उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, नेतृत्वगुण, लेखनकौशल्य, व्यावसायिक कौशल्य मिळविण्यासाठी शिक्षण इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा लोणावळा महाविद्यालयाचा व समता सेंटर फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन चा मानस आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page