लोणावळा नगरपरिषदेचा अनगोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर… मराठी सर्कस मालकाची व्यथा…

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,सुपर स्टार सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी आपल्या लेटरहेड वर दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी लोणावळा नगरपरिषदेला रीतसर अर्ज केला की आम्हाला दिनांक ९/२/२०२४ ते ५/३/२०२४ अशी २४ दिवसाची परवानगी द्यावी.त्यानंतर लोणावळा नगरपरिषदेने त्याप्रमाणे दरदिवशी रुपये २ हजार प्रमाणे २४ दिवसाचे ४८ हजार रुपये दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी सदर रक्कम भरली.तशी पावती सुद्धा पालिकेने दिली. त्यानंतरच सर्कसच्या मालकाने तंबू उभारण्याचे काम सुरु केले.परंतु ७ फेब्रुवारी रोजी लोणावळा शहर भाजप शहर अध्यक्ष अरुण लाड यांनी सदर पुरंदरे मैदानावरील खोदाईला हरकत घेतली.त्यांच्या हरकतीवर लोणावळा नगरपरिषदेने सर्कस मालकाला त्याच दिवशी नोटीस काढून सदर मैदानाचे नुकसान झाले म्हणून ३ लाख ३० हजार नुकसान भरपाई म्हणून त्वरित भरणा करावा अन्यथा सर्कस चे साहित्य जप्त करण्यात येईल असे त्यात नमूद करण्यात आले. त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी सर्कस मालकाने सदर ३ लाख ३० चा भरणा सुद्धा केला. त्यामुळे सर्कस मालकाने आपल्या तंबू बांधायला परत सुरुवात केली. परंतु पुन्हा पालिकेकडून सर्कस मालकाचे काम रोखण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सर्कस मालकास हरकत घेणाऱ्या व्यक्ती चे पत्र घेऊन या त्यानंतर काम सुरु करा सांगितले. त्यावर सर्कस मालकाने तेही पत्र लोणावळा शहर भाजप अध्यक्ष अरुण लाड यांचे सह त्यापत्रावर माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी नगरसेविका मंदा सोनावणे या तिघांच्या सह्या आहेत. परंतु शनिवार,रविवारी लोणावळा नगरपरिषदेचे कामकाज बंद असल्याने सर्कस मालकाला आपल्या कामाला सुरुवात करता आली नाही. सुपर स्टार सर्कस ही देशातील एकमेव मराठी माणसाची सर्कस असून देखील सर्कसित काम करणारे ४० ते ५० जण आणि त्यांचेवर अवलंबुन असणारे कुटुंब असे एकूण १५० ते २०० लोकांचा रोजी रोटी चा प्रश्न निर्माण झाला आहे.जेव्हा लोणावळा नगरपरिषदेला सर्कस मालकाने आपल्या लेटरहेड वर परवानगी साठी अर्ज दिला तेव्हा प्रशासन म्हणून सर्कस तंबू शिवाय होत नसते,तंबू बांधणार, खोदाई होणार, हे माहित असताना कोणी हरकत घेतल्यावर पुन्हा काम बंद पाडणे आणि सदर सर्कस मालकाची परवानगी रद्द केली अशी माहिती देऊन संभ्रम निर्माण करणे यावरून प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सर्कस मालक प्रकाश माने यांना आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. आधीच बंद होण्याचा मार्गावर असणाऱया सर्कशीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी आम्हाला आमची लुप्त होत असलेली कला सादर करण्याची लवकरात लवकर संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा सर्कस मालक यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us