पिंपरी चिंचवड महानगरपालिका ड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कर्मचारी व नागरिकांना दिली मतदान करण्याची शपथ

मावळ मराठा न्युज :-पिंपरी, ड प्रभागाच्या वतीने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान राजा ,जागा हो लोकशाही चा धागा हो अशा वेगवेगळ्या घोषणा देऊन, उपस्थित नागरिकांना ,व कर्मचारी यांना भयमुक्त मतदान व कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले. जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश हा भारत देशात आहे.लोकशाहीचे पावित्र्य राखत,चांगले स्वच्छ प्रतिमेच्या, जनतेच्या प्रश्नाची जाण असलेल्या उमेदवारांना मतदान करा. मतदानाला शासन सुट्टी देते याचा उपयोग भटकंती न करता.किंवा तिर्थयात्रेला न जाता आपला पवित्र मतदानाचा हक्क बजवावा असे आव्हान श्रीराम डुकरे यांनी केले.आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर अढळ निष्ठा ठेवून, याद्वारे आपल्या देशाच्या लोकशाही परंपरा आणि मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांचा सन्मान राखण्याची आणि निवडणुकीत धर्माचा विचार न करता मतदान करण्याची शपथ दिली., वंश, जात,धर्म, समुदाय, भाषा यांच्या प्रभावाखाली न पडता मतदान करू .अशी बेसिक्सचे टिमचे सुखदेव लोखंडे यांनी राजमाता जिजाऊ उद्यानाच्या ठिकाणी मतदान जनजागृतीद्वारे नागरिकांना शपथ दिली .यावेळी क्षेत्रीय अधिकारी डॉ. अंकुश जाधव ,सहा.आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी श्री. शांताराम माने ,मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. योगेश फल्ले , आरोग्य निरीक्षक रेश्मी तुंडूळवार यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड इन्चार्ज सुखदेव लोखंडे ,श्रीराम डुकरे सामाजिक कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page