कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांचे हस्ते राष्ट्रीय संमेलनात सामाजिक आयाम चे उदघाट्न

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्था २०२४ साली आपली शतकपूर्ती करीत आहे याचे औचित्य साधून इंडियन योगा असोसिएशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ आयुष यांच्या द्वारे समर्थीत योग- सांस्कृतिक समन्वयाचे एक साधन या विषयावरील पहिल्या सत्राचे सामाजिक आयाम चे उद्घाटन दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी निवृत न्यायाधीश आणि कैवल्यधाम गव्हर्निंग बॉडी चे सभासद एस. राधाकृष्णन, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, लेफ्टनंट जनरल डॉ.ए.के. सिंग, माजी न्यायाधीश श्री रमेश धानुका, प्रोफेसर गोपालकृष्ण जोशी, कुलगुरु, MIT, सोलापूर, श्री संतोष पॉल, जेष्ठ वकील, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, प्रोफेसर गिरीश चंद्र त्रिपाठी, माजी कुलगुरु, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी तसेच कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठाने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुणे न्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय संम्मेलनाच्या पहिल्या सत्राचे उ‌द्घाटन करण्यात आले.श्री सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि प्रमुख पाहण्यांचा शाल आणि कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा देऊन सन्मानित केले.माजी न्यायाधीश श्री रमेश धानुका यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर कैवल्यधाम संस्थेचा १०० वर्षाचा प्रवास यावरील माहितीपट संक्षिप्त स्वरुपात दाखविण्यात आला. निवृत्त न्यायाधीश श्री एस. राधाकृष्णन तसेच आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या. कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षात (२०२३ -२४ ) राबविण्यात आलेल्या प्रमुख कार्यक्रमांची चित्रफित दाखविण्यात आली.याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेच्या डॉ. शरदचंद्र भालेकर लिखित कोरियन भाषेत अनुवाद योग मुद्रा मेडिटेशन तसेच डॉ. रितु प्रसाद लिखित सात्विक आहारया पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांचा हस्ते करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page