स्वास्थ्ययोगाच्या सकारात्मक उर्जेचे करावे तितके कौतुक कमी – डॉ. ढाकेफाळकर; कलापिनी स्वास्थ्य योगाच्या २२ व्या वर्धापन दिनी ” हसरे तळेगाव” करण्याचा संकल्प!

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,“कलापिनी स्वास्थ्ययोगाच्या ज्येष्ठांच्या या सकारात्मक प्रचंड उर्जेचे करावे तितके कौतुक कमीच आहे. मी कलापिनीचा आजीव सदस्य व कलाकारही आहे. डॉ. अनंत परांजपे आणि कालापिनीतून खूप काही शिकलो, इथेच मी घडलो.” अशी भावना डॉ.अजय ढाकेफाळकर यांनी व्यक्त केली. निमित्त होते कलापिनी स्वास्थ्ययोगाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अजय ढाकेफाळकर, डॉ.कविता ढाकेफाळकर आणि जेष्ठ हास्य योगी निर्मला मायभाटे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. उषा धारणे यांनी ईशस्तवन सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कलापिनी स्वास्थ्ययोग,केंद्र शाखा, सासरमाहेर हास्य संघ, वनश्री नगर व नानानानी पार्क हास्यसंघ, पंचवटी कॉलनी यांनी बहारदार सादरीकरण करत उपस्थितांकडून वाहवा मिळवली. त्यात समुह नृत्ये, पुरुष हास्ययोगींचे नाट्य अभिवाचन, सासरमाहेर कडून नणंद भावजय यांची मिश्किल नोकझोक ,सोलो डान्स आणि खुमासदार विडंबन गीत सादर करण्यात आले. पांडुरंग देशमुख यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.डॉ.अनंत परांजपे यांनी आपल्या प्रास्ताविकात हास्य योगाची सध्याच्या धकाधकीच्या जीवनात किती आवश्यकता आहे हे सांगितले व १०मे पासून सुरू होणाऱ्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा व आपली गुणवत्ता आणखी वाढवा असे आवाहन केले.डॉ. कविता ढाकेफाळकर यांनी स्वास्थ्ययोग्यांच्या उत्साहाचे भरभरुन कौतुक केले. डॉ.कविता यांनी हास्य उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा प्रगट केली. मायभाटे काकूंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.हास्ययोग म्हणजे तणावमुक्ती, एकटेपणावर मात, समवयस्कांची मैत्री, यातून मिळणारा आगळा आनंद. नियमित योगामुळे, व्यायामाने तब्येत ठणठणीत राहते याचा अनुभव हास्ययोगींनी सांगितला. हास्यसंघाचे प्रमुख अशोक बकरे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करुन औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा नातू व माया घाटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व हास्ययोगींनी परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page