सुपर स्टार सर्कस मालक माने ठोकणार लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी साबळेच्या विरोधात ३५ लाख नुकसान भरपाईचा दावा


मावळ मराठा न्युज:-लोणावळा,ना लोकप्रतिनिधी ना जनता ना पत्रकार यांनी विनंती करून देखील लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी यांनी आपला मनमानी पद्धतीने कारभार असाच सुरु ठेवला तर एक दिवस लोणावळा नगरपरिषदेला सर्कस वाल्याने केलेला खड्डा तर त्याने भरला पण मुख्याधिकारीएवढा खड्यात पाडतील तर तो कधीही भरता येणार नाही. सर्कशी संदर्भात त्यांना मावळचे आमदार सुनील शेळके, मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे,लोणावळ्यातील सुजाण नागरिक तसेच पत्रकार यांनी देखील वैयक्तिक विनंती केली परंतु मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सर्वांच्या विनंत्या धुडकाऊन लावल्या. नियमांचे कठोर पालन करणारा अधिकारी म्हणून त्यांना आपली प्रतिमा तयार करायची असेल ही चांगली गोष्ट आहे. परंतु सर्कस वाल्याचा परवानगी ते परवानगी रद्द करण्यापर्यंतचा घटनाक्रम जर पाहिला तर यात सर्कस वाल्याची प्रथम दर्शनी कोणतीही चूक दिसत नाही. रीतसर परवानगी,नियमप्रमांणे भरणा त्याने केला. मैदान खोदले त्याचा ही अनामत म्हणून ३ लाख ३० हजाराचा चेक दिला मग खरी अडचण कुठे आली? ते सर्व सामान्य माणसाला समजायला हवे.सर्कसची परवानगी लोणावळा नगरपरिषदेने रद्द केल्याने यासंदर्भात झालेल्या आर्थिक,मानसिक, सामाजिक, शारीरिक नुकसानी आणि सर्कशीतील कलाकारांचा रोजगार हिसकावून घेतल्याबद्दल सर्कस मालक यांनी मुख्याधिकारी अशोक साबळे कोणाचे ही ऐकत नसल्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत येथील प्रथित यश कायदेतज्ञ् ऍड अभय पळनिटकर यांच्या मार्फत लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेवर एकूण ३५ लाखाची नुकसान भरपाईची नोटीस पाठवली असून लोणावळा नगरपरिषदे विरोधात लवकरच न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे ऍड अभय पळनिटकर यांनी मावळ मराठा न्यूजशी बोलताना सांगितले आहे.मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी नियमानुसार काम करणारा अधिकारी म्हणूनच यापुढेही काम करत राहावे त्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी,लोणावळेकर नागरिक आणि पत्रकार यांचे अजिबात ऐकू नये. आणि यापुढे या सर्वांची देखील आपल्या नियमानुसार काम करण्यावर बारीक लक्ष राहील.त्यामुळे आपणास यापुढील वाटचालीस मावळ मराठा न्युज च्या हार्दिक शुभेच्छा.




