२० फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवप्रेमीना शिवकालीन शस्त्रे,नाणी व कागदपत्रे पाहण्याची सुवर्ण संधी


मावळ मराठा न्युज:- लोणावळा,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शंकरबन प्रतिष्ठान लोणावळा व हिंदू समिती लोणावळा व ग्रामीण परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ०७:०० पर्यंत शिवशस्त्र गाथा या कार्यक्रमाचे महिला मंडळ सभागृह, पुरंदरे हायस्कूल जवळ, लोणावळा येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये इतिहास अभ्यासक व संशोधक, संग्राहक श्री संतोष चंदने यांनी जतन केलेली शिवकालीन शस्त्रे, नाणी व कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्त लोणावळा व परिसरातील विद्यार्थी, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी यांच्या साठी खास पर्वणी असणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन श्री सत्यसाई कार्तिक सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच याचं दिवशी सायंकाळी ०७:०० ते ०८:३० या वेळेत समर्थभक्त ह.भ.प मुग्धा ताई पुंडे लोणावळा यांची छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय नीती या विषयावर नारदीय कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. तसेच प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. तरी लोणावळा व परिसरात सर्व शाळांचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शंकरबन प्रतिष्ठान व हिंदू समिती लोणावळा व ग्रामीण परिसर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




