प्रज्ञा सूर्य,बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर रचित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वरील कविता



शहरे खेड्यांमधून उसळला निळा जनसागरनिळे अंबर, निळा सागर या भारत भूमीवरजय भीमचा देत नारा जनता झाली एक स्वरएक त्राता विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर!!१!!संविधान देशाचे दिले महामानवाने उपकारस्वातंत्र्य, समता, बंधूता त्रिसूत्री याचा मंत्र आधारप्रज्ञा सूर्य तळपला मिटला अज्ञानाणा अंधःकारनत झाली कोटी शिरे अंतरी कृतज्ञता अपार !!२!!शिका, संघटीत व्हा नि अन्यायाविरुद्ध करा एल्गारआदर्श नव युवकांचे नव समाजाचे झाले अंगारशतकांची अढी कसली विसरा मनातला विखारसूक्ष्म अंतराय सुशिक्षितांचा तो बेकीचा व्यवहार!!३!!तोडा फोडा राजनीती ने केला भेदभाव जातींवरझुंजू नका आपसात ओऴखा कावा तुम्ही वेळेवरअस्मिता अनाठायी नका करू उगाच भाव आपपरदीनदुबळ्यांचे कैवारी कर्तृत्वाने जाहले अमर!!४!!बाबू फिलीप डिसोजा कुमठेकरद्वारा – डॉ. साई प्रसाद कुमठेकरमो. ९८९०५६७४६८




