पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बोर घाटात गुरुवारी मंदिरात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बोर घाटात गुरुवारी मंदिरात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ईरटीका कारला एका वाहनाने दिलेल्या धडकेने ही भीषण दुर्घटना घडली आहे.तर सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. उशिरापर्यंत मृत व जखमी व्याक्तींची नावे समजू शकलेली नव्हती.

मुंबईच्या दिशेने येत असलेल्या ईरटीका गाडी मच्छिंद्र अबोरे वय 38 वर्ष राहणार पिंपरी चिंचवड हे चालवीत होते. रात्री बाराच्या सुमारास मुंबईपासून अलीकडे बोर घाटात भेकू गावचे हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. आतील प्रवासी दरवाजा तुटल्याने बाहेर फेकले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने 5 जणांचा जागीच मृत्यू झाला . महामार्गावर जात असलेल्या वाहना पैकी एका वाहन चालकाने महामार्ग पोलिसांना हा प्रकार कळविला त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले. जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविले त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

रात्री खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ईरटीका कार क्रमांक एम एच 14 एसी 3501 ही गाडी पाठीमागून कंटनेरला वेगात धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये कार मध्ये असलेल्या एकूण प्रवाशा पैकी 5 प्रवासी जागीच मयेत झाले असून चार जण जखमी आहेत सदरचा अपघाता ईरटीका चालकाने वाहन वेगात व हलगर्जिने चालविल्याने हा भिषण अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलीस प्रमुख रायगड यांनी व्यक्त केला आहे
रोखठोक आणि बेधडक निर्भिड बातम्यासाठी मुख्य संपादक सुभाष माने ब्युरो रिपोर्ट रायगड.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us