विज्ञान दिनानिमित्त शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड येथे तंत्र प्रदर्शन

मावळ मराठा न्युज, पिंपरी :-शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था.पिंपरी चिंचवड पुणे येथे दि.२८/०२/२०२४ रोजी विज्ञान दिनाचे औचित्य साधून संस्था स्तरावरील तंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.सर्व व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी यात उत्साहात सहभागी झाले.नियमित प्रात्यक्षिक पेक्षा प्रक्षिक्षणार्थांची कल्पना शक्ती व क्रयशक्ती दाखवणारे प्रोजेक्ट्स यामधे सादर झाले.संस्थेचे प्रा.मा.शशिकांत साबळे साहेबांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले.यावेळी संस्थेचे गटनिदेशक श्री अशोक मोरे, श्री गवारी पी.टी. व सर्व निदेशक, कर्मचारी उपस्थित होते.फळे व भाज्यांवर संस्करण या व्यवसाया तर्फे यानिमित्ताने संपुर्णपणे प्रशिक्षणार्थी निर्मित फुड माॅल चे नियोजन केले होते.याठिकाणी ही प्रक्षिक्षणार्थांनी छान प्रतिसाद देत खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.या प्रदर्शनाला आकुर्डी येथील मुक बधीर विद्यालययाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली व आपली जिज्ञासू वृत्ती दाखवली

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page