लोणावळ्याचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराजांना नारळ वाढवत आमदार सुनील शेळके यांचा प्रचाराचा शुभारंभ




मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा शहरामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी रिपाई, लोक जनशक्ती पक्ष या महायुतीचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांचा जनसंवाद दौरा आज शनिवारी सुरू आहे. सकाळी नऊ वाजता वळवण गावातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन या जनसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली. पुढे नांगरगाव, स्वराज्य नगर, कालेकर मळा, डेनकर कॉलनी, जिजामाता नगर, गवळीवाडा, लोणावळा बाजारपेठ, भांगरवाडी भांगरवाडी पाण्याची टाकी, लोहगड उद्यान, कुडले घर ते हुडको, कैलास नगर, पांगारे चाळ, वर्धमान सोसायटी, सिद्धार्थ नगर, रोहिदास वाडा, लोणावळा गावठाण, शनी मंदिर, रायवूड, खोंडगेवाडी, रामनगर, भुशी, लाल टाकी गणेश मंदिर, भोमे वस्ती, ठोंबरेवाडी, जुना खंडाळा असा हा जनसंवाद दौरा होणार आहे. या जनसंवाद दौऱ्याला लोणावळा शहरांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहून आमदार सुनील शेळके यांना समर्थन देत आहेत तर या नागरिकांना नतमस्तक होत येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन आमदार सुनील शेळके करत आहेत. महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी लोणावळा शहराचे ग्रामदैवत असलेल्या गावठाण येथील भैरवनाथ महाराजांना नारळ वाढवत करण्यात आला आहे. यानंतर वरील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार सुनील शेळके यांच्या जोरदार घोषणा देत गावठाण परिसरामध्ये तसेच लोणावळा बाजार परिसरात मोठी प्रचार रॅली काढत आमदार सुनील शेळके यांचा कार्य अहवाल घराघरात पोहोचवला, आमदार सुनील शेळके यांनी मागील पंचवार्षिक काळामध्ये मावळ तालुक्यामध्ये व लोणावळा शहरांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती जनसामान्यांना देण्यात आली. शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी भांगरवाडी व बाजार परिसरामध्ये अशीच भव्य रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकंदरीतच लोणावळा शहरांमध्ये आमदार सुनील शेळके यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचार रॅलीला सर्वसामान्य नागरिकांचा व विशेषता महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमदार सुनील शेळके यांच्या कन्या यांनी देखील नांगरगाव परिसरामध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. दोन दिवसांपूर्वी कुसगाव या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी देखील भव्य प्रचार रॅली काढत आमदार सुनील शेळके यांचा प्रचार केला. कुसगाव भागातून देखील आमदार सुनील शेळके यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अच्छा जनसंवाद यात्रेला देखील मिळत असलेला प्रतिसाद पाहता आमदार सुनील शेळके यांनी प्रचारांमध्ये लोणावळा शहरांमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.




