“शाळेतील तायक्वादो स्पर्धा,कौशल्य आणि विजयाचा सामना!”



मावळ मराठा न्युज नेटवर्क -दिनांक: ८ मार्च २०२५शाळेतील त्वायकोंडो मॅच मध्ये विद्यार्थ्यांनी दाखवला उत्कृष्ट सामना नुकत्याच ‘सुमन रमेश तुलसिआनी इंटरनॅशनल स्कूल’ या शाळेमध्ये इंटर स्कूल मॅचेस त्वायकोंडोच्या स्पर्धा संपन्न झाल्या, त्यात अनेक शाळा सहभागी होत्या व त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली या स्पर्धेचे आयोजन शाळेच्या शारीरिक शिक्षणविभागाने केले होते. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम सौ श्रद्धा पाझारे व प्रमुख पाहुणे ॲड- श्री तळेकर सर व श्री बोभाटे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले त्यावेळी सर्व मुलांच्या चेहऱ्यावर खेळाची उत्सुकता दिसून येत होती .विविध गटांमध्ये झालेल्या मॅचेस मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या त्वायकोंडो कौशल्याची प्रचिती दिली. स्पर्धेतील प्रमुख आकर्षण विविध गटांमध्ये झालेल्या चुरशीच्या भिडती होत्या. विद्यार्थ्यांच्या वजनानुसार ,वयानुसार गट तयार करण्यात आले होते सर्व मुलांमध्ये आपल्या तिखट आणि तीव्र मुद्रांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याची उर्मी दिसून येत होती अनेक विद्यार्थी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत होते आणि आपले नाव पदकावर कोरत होते. स्पर्धेतील इतर गटांमध्ये देखील चांगल्या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला शाळेतील विद्यार्थ्यांना त्वायकांडो प्रशिक्षक श्री बोभाटे सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले हा प्रकार विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचा आहे या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व नेतृत्व कौशल्य मिळवून देतो असे श्री बोभाटे सर यांनी सांगितले अखेर विजेता विद्यार्थ्यांना शाळेच्या क्रीडा शिक्षकांच्या व मुख्याध्यापिका मॅडम यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले त्वायकोंडो स्पर्धेने विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक भावना जागवली असून भविष्यात अशी स्पर्धा नियमितपणे आयोजित करण्याचे ठरवले आहे. या कार्यात शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आपले मोलाचे सहकार्य दिले. अशाप्रकारे नवीन आशा व उमेद घेऊन कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी ठीक सात वाजता झाली.




