डॉ .बी . एन . पुरंदरे बहुविध विद्यालय प्राथमिक विभाग पारितोषिक वितरण समारंभमावळ


मराठा न्युज :- लोणावळा,मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी शाळेच्या प्राथमिक विभागाचा वर्षभरातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, शाळेच्या परंपरेनुसार शाळेच्या नावलौकिक प्राप्त माजी विद्यार्थ्याच्या शुभहस्ते पार पडला .जे माजी विद्यार्थी आपल्या शिक्षणाने, कर्तुत्वाने समाजात आपला व शाळेचा नावलौकीक वाढवतात अशा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ करण्याची शाळेची परंपरा आहे . या वर्षी शाळेचे माजी विद्यार्थी मा . श्री . आशिष मेहता, B.E Elec., मा . श्री सागर तावरे G . D. Art . व मा . श्री . ललित ओसवाल, यशस्वी व्यावसाईक यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला . इ . १ ली ते ४ थी च्या विद्याथ्यांना दिली जाणारी प्रशिस्ती पत्रक श्री सागर तावरे यांच्या सौजन्याने प्राप्त झाली . तसेच इ . १ ली ते ४ थी मधील प्रत्येक वर्गातील एक हुशार विद्यार्थ्यास व एका शिक्षकांना विशेष पारितोषिक श्री सागर तावरे यांच्याकडून देण्यात आले . तसेच वरील तीन्ही पाहुण्यांनी मुलांन यावेळी खाऊ वाटप केला . अतिषय आनंदी आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला . यावेळी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कलिका ‘या हस्तलिखिताचे प्रकाशन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री . आनंद गावडे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले . सौ . सरला विरकर यांनी सुत्रसंचलन केले तर सौ नेहा सोनवणे यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ . रसिका जगदाळे, सौ . जयश्री वाघमारे , तसेच बालवाडी च्या शिक्षिका सौ . कमलवार व सौ .पाटसरकर यांनी मेहनत घेतली . याच बरोबर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री बारावकर, चित्रकला शिक्षक श्री आंदूरे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .




