लोणावळा महाविद्यालयात जयवंत दळवी याचा सत्कार समारंभ संपन्न

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट डॉ बी. एन. पुरंदरे कला श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय लोणावळा येथे दि. २१.२.२०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक कु.जयवंत बाळू दळवी याचा प्रजासत्ताक दिन संचालन शिबीरामध्ये केलेल्या कामगिरी बद्दल मा. श्री. सीताराम डुबल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा शहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु. कुंजन दळवी (एम. कॉम-I) याचा पॉवर लिफ्टिंग मध्ये राज्यस्तरावर सुवर्ण पदक मिळाल्या बद्दल कौतुक व सत्कार करण्यात आला . “महाविद्यालयीन शिक्षण घेतअसताना ध्येयवादी आणि शिस्तबद्ध असणे खूप महत्वाचे आहे”, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लोणावळा एडुकेशन ट्रस्ट चे सचिव मा. श्री. दत्तात्रय पाळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मा. श्री. दत्तात्रय येवले, विश्वस्थ लो.एड.ट्रस्ट, मा. श्री कृष्णा भंडलकर, राज्यपाल घोषित सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व मा.श्री. धनंजय चंद्रात्रे, स्टे.मा. राष्ट्रीय अध्यक्ष रेल्वे, याची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉ.डी.जे. दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचलन डॉ.पवन शिनगारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सौ.क्षमा कारेकर यांनी केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page