जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्राधिकरणात तीनशे जणांची आरोग्य तपासणी


मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशन आणि स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा तीनशे जणांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत सदस्य विनायक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर भाजपाचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष पवार काका, सचिव मिलिंद कुलकर्णी व सहसचिव भाग्यश्री, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर आर एस कुमार, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर रिकामे, प्रदीप बेंद्रे, मनोज देशमुख, मुन्ना शेख, नरेंद्र येलकर, बाळासाहेब भिंगारकर, नाना कांबळे, चंद्रकांत धर्माधिकारी, सचिन उदागे, आपला पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सुनील मुदमे व सोबती सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.हे शिबीर डॉ हेमंत देवकुळे त्यांच्या पुढाकाराने घेतलेल्या शिबिरात राज्यपाल पुरस्कृत डॉ प्रवीण बडे यांनी अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तीनशे नागरिकांची संपूर्ण शरीराची तपासणी केली. संजीवनी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेतले. मेडिकव्हर हॉस्पिटलच्या टिमने ईसीजी तपासणी केली, रक्त तपासणी, रक्तातील साखरेची पातळी या तपासण्याचा दीडशे नागरिकांनी लाभ घेतला. तसेच निदान पॅथलॅब च्या सहकार्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण, शरीरातील पेशीचे प्रमाण, रक्तदाब तपासणी व शरीरातील साखरेचे प्रमाण इत्यादी तपासण्याचा दोनशे नागरिकांनी लाभ घेतला. तसेच दंतचिकित्सक डॉ प्रीती अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने जवळपास शंभर नागरिकांची दंतचिकित्सा तपासणी केली.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राहुल बल्लाळ, अमर नांगरे, प्रज्ञा देवकुळे, तुषार देवकुळे व स्वाती देवकुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.




