सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर,जिल्हा नामफलकाचे उद्घाटन


मावळ मराठा न्युज :-पिंपरी – प्रतिनिधी, मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या वतीने अध्यक्ष आण्णासाहेब कसबे व उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर जिल्हा या नामफलकाचे उद्घाटन माजी अध्यक्ष रामदास कांबळे व डी पी खंडाळे तसेच सतिश भवाळ यांच्या शुभहस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी माजी अध्यक्ष तथा सकल मातंग समाज समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांनी या माध्यमातून मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे मत व विश्वास व्यक्त केला.यावेळी माजी अध्यक्ष सतिश भवाळ,डी, पी खंडाळे, रामदास कांबळे, युवराज दाखले, आण्णासाहेब कसबे, चंद्रकांत लोंढे,आबा मांढरे,राजु आवळे, अविनाश शिंदे, गणेश कलवले, माणिक पौळ,बाबु पाटोळे, विठ्ठल झिझुर्डे, बालाजी गवारे, सुरेश भिसे, मंगेश डाखोरे,महीला आघाडीच्या सविताताई आव्हाड, संगीताताई जाधव, यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते




