नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी लोणावळा भाजप पदाधिकारी यांची सदिच्छा भेट

मावळ मराठा न्युज -लोणावळा,भाजपाच्या पुण्यातील आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांनी नुकतीच लोणावळ्यातील भाजप कार्यकर्त्याची आगामी नगरपालिका निवडणूक च्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट घेतली. लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड,भाजप लोणावळा मंडल नवनिर्वाचित अध्यक्ष अनंता गायकवाड, कुसगावच्या सरपंच, अश्विनी ज्ञानेश्वर गुंड,राजू बच्चे,प्रमोद गायकवाड,राजेंद्र दळवी,साठे,आशिष बुटाला,रामविलास खंडेलवाल,महिला पदाधिकारी वाळुंज,योगिता कोकरे,रावळभाभी, फासे मम्मी आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांचा परिचय करून घेतला आणि लवकरच लोणावळा नगरपरिषदच्या प्रलंबित विकास कामासंदर्भात मुंबईत सर्व संभंधीत अधिकारी यांची आढावा बैठक लावून कामे मार्गी लावू असे आश्वासन राज्यमंत्री मिसाळ यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले. माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास,वैद्यकीय शिक्षण,अल्पसंख्याक विभाग,सामाजिक न्याय आणि वाहतूक विभाग या खात्यांची जबाबदारी मिसाळ यांच्याकडे आहे.त्यामुळे लोणावळा नगरपरिषदेची प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामे त्यांच्या माध्यमातून मार्गी लावता येतील असे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page