स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित शिबिरात १३० रुग्णांना चष्मे वाटप तर ३८ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया


मावळ मराठा न्यूज,पिंपरी(प्रतिनिधी) चिखली येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित स्वामी विवेकानंदांच्या १६० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात २२५ गरजू लोकांना शिबिराचा लाभ घेतला.१३० रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले. ३८ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. सर्व रोटरी क्लब पिंपरी,मयूर हॉस्पिटल आणि एचडी देसाई हॉस्पिटल हडपसर आणि स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय प्रधान, रो.सूर्यकांत जाधव,रो.विभा झुत्शी रो. संतोष गिरांजे रो.नितीन ढमाले,सदानंद नायक याचप्रमाणे हॉस्पिटलचे डॉ विजय भळगट,डॉ प्रीती भळगट आणि डॉ.संजय कुलकर्णी तसेच विभागातील ज्येष्ठ नागरिक विश्वास सोहनी, डॉ गणेश शिंदे उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेबडे,महेश मांडवकर ,संतोष ठाकूर, जयसिंग भोसले ,विक्रमादित्य ठाकूर,शंकरराव बनकर, सुनील पंडित, सुनील खंडाळकर ,दिलीप मांडवकर, मिलिंद वेल्हाळ वेल्हाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी अनेकांनी आपले मनोगतत व्यक्त केले व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे आभार मानले. सूत्रसंचालन रामराजे बेंबडे यांनी केले.




