माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिना निमित्त शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने प्रतिमा पूजन व अभिवादन

मावळ मराठा न्यूज़ ,लोणावला, शिवसैनिकांच्या माय माऊली वात्सल्याच्या सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त आज शिवसेना लोणावळा शहर व शहर महिला आघाडीच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालय लोणावळा येथे माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी लोणावळा शहरप्रमुख कल्पनाताई आखाडे, मावळ तालुका शिवसेना सल्लागार मारुती खोले,शिवसेना महिला आघाडी उप तालुका संघटक संगिताताई कंधारे, शिवसेना महिला आघाडी शहर सह संघटक मनिषाताई भांगरे,महिला आघाडी उप शहर संघटक सुरेखा देवकर, माग्रेट मुन्नास्वामी, प्रिया पवार, अनिता गायकवाड, सिमा दिघे शिवसेना उपविभाग प्रमुख दिलीप गायकवाड, जेष्ठ शिवसैनिक श्रीकांत कंधारे,धिरज घारे व शिवसैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page