पवन मावळातील पानसोली गावात जखमी झालेल्या बिबट्यास पकडण्यास वन विभागाला यश


मावळ मराठा न्यूज, (ॲड गणेश जगताप) दिनाक १६.०१.२०२३ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास मौजे पानसोली ता.मावळ येथे बिबटया दिसल्या संदर्भात स्थानिक महिला श्रीमती दिपाली आनंदा ठोंबरे यांचे दूरध्वनीवर प्राप्त संदेशनुसार सदर ठिकाणी श्री एच. ए. जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ, श्रीमती डी. पी. डोमे वनपाल, देवळे, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक,मावळ यांचे सहाय्याने पानसोली (कोळेचाफेसर) गट मालकी गट नंबर १६ मध्ये १ वर्ष वयाचा बिबट तारेच्या कुंपण मध्ये अडकल्याने व त्यांच्या चारही पायाला काचे मुळे जखम झाल्याने रेस्क्यु करण्यात आला. बिबट जखमी असल्याने पुढील उपचारासाठी रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव येथे पाठवण्यात आले आहे. सदर रेस्क्यु अॅापरेशन मा. श्री. एन.आर.प्रवीण (भा.व.से) मुख्य वनसंरक्षक प्रा. पुणे, श्री मा.राहुल पाटील, (भा.व.से) उपवसंरक्षक प्रा. पुणे व श्री.आशुतोष शेंडगे सहाय्यक वनसंरक्षक प्रा. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली.श्री एच. ए. जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ, श्रीमती डी. पी. डोमे वनपाल देवले, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा , वनकर्मचारी आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे ,अनिल अंद्रे,गणेश निसाळ,विनय सावंत,जिगर सोलंकी आदींनी सहभाग नोंदवला.




