ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा येथे शिक्षकांची कार्यशाळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.गंभीर यांचा उपस्थितीत संपन्न

मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश गंभीर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.शिक्षकांनी कोणताही विषयाचे अध्यापन करताना मुलांना पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त दैनंदिन जीवनाशी संदर्भ असणारी उदाहरणे दिले तर विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचे आकलन होणे सहज आणि सोपे होते.मानवी ज्ञानेंद्रियांचा उपयोग ज्ञानग्रहण करण्यासाठी होत असतो.आदिमानवाने निरीक्षणातून ज्ञान घेतलेज्ञान देणे घेणे हे जीवनभर चालणारी क्रिया असून आपण सारे जण आयुष्यभर विद्यार्थी असतो असे ज्येष्ठ शास्त्रज्ञडॉ. व्यंकटेश गंभीर यांनी व्यक्त केले .कार्यशाळेचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी केले.सूत्रसंचालन मुख्याध्यापक अमोल साळवे यांनी केले.यावेळी संस्थेचे विश्वस्त संजीव वीर आणि आनंद नाईक ,कल्पना चावला स्पेस अकॅडमी चे संचालकडॉ संजय पुजारी उपस्थित होते.ॲड .बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page