लायन्स क्लब लोणावळा सुप्रिमोज यांनी केला देवळे,मावळ येथील अनाथाच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित

मावळ मराठा न्युज – देवळे मावळ,पीएमजेएफ ला. राजेशजी अग्रवाल, पीआयडी नरेंद्र भंडारी सर,राष्ट्रीय समन्वयक सेवा आठवडे) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि पीआयडी नरेंद्र भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळे येथील बेघरांसाठी शिक्षणग्राम आश्रम शाळा येथे मानसिक आरोग्य आणि निरोगीपणा या विषयावर भव्य कार्यक्रम पार पडला. माननीय पीआयडी नरेंद्र भाई यांनी १४५ मुलांना मानसिक आरोग्य आणि निरोगीपणा या विषयावर एक सुंदर समुपदेशन सत्र आणि प्रभावी व्यावहारिक टिप्स दिल्या. वक्त्यांनी त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुमधुर भाषणाने या बेघर मुलांना प्रेरणा दिली. पीआयडी नरेंद्र भाई खोपरकर यांच्या समुद्देशक सत्रानंतर संगीत वाद्यवृंद सुनील कोपरकर यांच्या सौजन्याने या मुलांसाठी आयोजन करण्यात आले.जिथे त्यांनी सुमधुर गीतांचा आनंद घेतला. २ तास संगीत आणि गाणी शुद्ध शाकाहारी जेवण देखील शेल्टर होम मधील या १४५ मुलांसाठी टीम लोणावळा सुप्रीमोजद्वारे प्रायोजित करण्यात आला.. या मेगा उपक्रमाचे नेतृत्व क्लब अध्यक्ष एमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांनी केले.उपक्रम अध्यक्ष लायन पूनम सुतार यांनी केले.समन्वयक एमजेएफ ला. अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग) या प्रसंगी आणि उपक्रमाला उपस्थित होते लायन विश्वनाथ पुट्टोल..ला. रंजना पुट्टोल (क्लब सेक्रेटर)..ला. छाया वर्तक (क्लब कोषाध्यक्ष)..ला. पल्लवी शेट्टी..ला. छाया माळी, ला. झीशान सय्यद,ला. फौजिया सय्यद,ला. रेखा मातेरे, आणि एमजेएफ ला. सुधीर कदम डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन माननीय योगिता मून मॅडम,माननीय सतीश मून सर आणि शिक्षणग्रामचे इतर कर्मचारी आदीमान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page