लोणावळा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी फ्लॅट/रो हाऊस बांधून सर्रास भाडेतत्त्वावर चालवणाऱ्यांना व्यावसायीक कर लावा -संदीप पोटफोडे



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा नगरीत संपूर्ण संपूर्ण जगातून लाखो पर्यटक येत असतात. लोणावळ्यात रोजगार म्हणून हॉटेल्स,लॉज हेच सर्वात मोठे रोजगार निर्मितीचे साधन आहे आणि इकडे येणारा पर्यटक हा मौज मस्ती आणि आनंद मिळवण्यासाठीच येत असतो. लोणावळा हे पुणे आणि मुंबई या मोठ्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शनिवार रविवार येथे पर्यटक लाखोच्या संख्येने येत असतात.याठिकाणी हॉटेल्स ऐवजी पर्यटक खाजगी बंगलो येथे राहण्यास जास्त पसंती देतात.त्यामुळे खाजगीबंगले मालक येथे कधीतरीच येतात त्यामुळे आपल्या बंगल्याचा वापर आता ती भाड्याने देतात त्यात त्यांचा बंगल्याचा देखभालीचा खर्च निघून चांगले उत्पन्न देखील मिळते आहे.अश्या बंगल्याची लोणावळा नगरपरिषदेत खाजगी निवासी बंगले अथवा मालमत्ता म्हणून नोंद आहे. पंरंतु त्यांचा वापर कमर्शीअल पद्धतीने सर्रास वापर होत आहे. ज्यात पाणी,वीज, टॉयलेट,बाथरूम,शहराची स्वच्छता अश्या सोयी पुरवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेवर ताण येतो.तो कमी करण्यासाठी निवासी बंगले/फ्लॅट/रोहाऊस बांधून सर्रास भाडेतत्त्वावर चालवणाऱ्यांना व्यावसायीक कर लावण्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे लोणावळा नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. यामुळे नगरपरिषदेस जास्तीत जास्त कर गोळा होऊन पैसै नाही म्हणून विकास कामे थांबणार नाही व लोणावळा शहराच्या विकासाला गती मिळेल अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले. सदर देताना महाराष्ट्र सैनिक संदीप लक्ष्मण पोटफोडे व मा. शहर उपाध्यक्ष रितेश भोमे उपस्थित होते.




