लायन्स क्लबचा मानाचा लायन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२५ सुप्रिमोजच्या अध्यक्षा सुरेय्या वाडीवाला यांना प्रदान










मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या अध्यक्षा एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांना दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी शेरेटन ग्रँड हॉटेल-पुणे येथे आयोजित पुरस्कार समारंभात समाज कल्याणासाठी लायन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२५ देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. माननीय डिस्ट्रीक्ट गव्हर्नर पीएमजेएफ ला. राजेशजी अग्रवाल आणि इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या अध्यक्षा सुरेय्या वाडीवाला यांना समाज कल्याणासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपत,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत,अत्यंत गरीब आणि गरजूना महिन्याचे किराणा सामान,अपंगत्व मुलामुलींचासंवाद शाळेच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवणे,वृद्धाश्रम येथे जाऊन त्यांना मदत करणं अश्या सर्व सामाजिक कार्याबद्दल असा हा महत्त्वाचा आणि सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. “द लायन्स एक्सलन्स अवॉर्ड-२०२५”पुरस्कार समारंभाच्या वेळी टीम लोणावळा सुप्रीमो सदस्य ला. विश्वनाथ पुट्टोल, ला. रंजना पुट्टोल क्लब सेक्रेटरी, एमजेएफ ला. सुधीर जी कदम (डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन) आणि चार्टर प्रेसिडेंट अँड डीसी इमेज बिल्डिंग एमजेएफ ला. अमीन वाडीवाला आदी मान्यवर उपस्थित होते.मावळ मराठा न्युज परिवाराकडून त्यांचे मनापासुन अभिनंदन.



