मावळ, मुळशीचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळुंज यांच्या आई,वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त अम्बवने येथे महाआरोग्य शिबिर



मावळ मराठा न्यूज़ अम्बवने:- दिनांक २८ ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब ऑफ लोनावला लेजेन्टस चे ज्येष्ठ सदस्य श्री नंदकुमार वाळंज यांच्या आई वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. आंबवणे येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात ७२१ लोकांची तपासणी करण्यात आली.४०० लोकांची जनरल तपासणी करण्यात आली.३२० लोकांची. हाडांची तपासणी करण्यात आली.१३५ लोकांचे डोळ्याची तपासणी करण्यात आली. ६० लोकांचे दाताची तपासणी करण्यात आली.३१२ लोकांचे ब्लड शुगरची तपासणी करण्यात आली.१४८ लोकांचे ब्लड ग्रुपची तपासणी करण्यात आली.१७८ लोकांचे हाडाचा ठिसूळपणा म्हणजे Bone density चेक करण्यात आले.६०० रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले.६० रुग्णांची रक्ताची तपासणी करण्यात आली.३५ रुग्णांची कॅन्सर ची तपासणी करण्यात आली.८० लोकांची आभा कार्ड ची नोंद करण्यात आली.५६० रुग्णांना मोफत यश हॉस्पिटल मित्र कार्ड देण्यात आलं ज्यांच्यामुळे ते पूर्ण वर्षाभरासाठी सुविधा घेऊ शकतात.रक्तदान शिबिरामध्ये वीस लोकांनी सहभाग घेतला. प्रत्येकाला पाच लाखाचे इन्शुरन्स देण्यात आले.२५ रुग्ण यांची मोफत मोती बिंदु शस्त्रक्रियेसाठी देसाई हॉस्पिटल, पुणे येथे पुढील आठवड्यात नेण्यात येणार आहे .या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट प्रमुख लायन नंदकुमार वाळंज व यश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हेमंत अग्रवाल हे होते.या कार्यक्रमात देवरे सर, लायन सुरेश गायकवाड, लायन अमित अग्रवाल डॉ राजू खंडेलवाल यांनी मोठे परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी. यश हॉस्पिटल लोणावळा व ओम हॉस्पिटल भोसरी. देसाई ट्रस्ट पुणे. मावळ वार्ता फाउंडेशन मनशक्ती केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवणे, आम्बी वैली हॉस्पिटल, कोराईगड शिक्षण संस्था यांनी सहभाग घेतला.डॉक्टर मध्ये डॉक्टर राशी मोदी, डॉक्टर नेहेल खंडेलवाल, डॉक्टर सुहास गोसावी, डॉक्टर अशीता शहा,, डॉ मोहिते,डॉक्टर राजेश चव्हाण. नंदकिशोर खंडेलवाल. ओम हॉस्पिटल ची टीम हे सगळे उपस्थित होते.या प्रसंगी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन पार पडले. पाचशे वारकरी बांधवाना शबनम भेट दिली.बाल आशा घर येथील सर्व विद्यार्थ्याना जर्किन चे वाटप करण्यात आले.गावातील श्री शंकर मंदिरा जवळ लोणावळा लायन क्लब लिजन्ट्स यांचे वतीने भाविकांसाठी स्वच्छता गृह २ युनिट देण्यात आले . या कार्यक्रमात मुळशी मावळ मधील सर्वच क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते यांनी भेट दिली.वाळंज विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी नियोजनात सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी केला.




