शिवदुर्ग मित्र लोणावळा आयोजित २४ व २५ मे ला दुसरी ओपन नॅशनल बोल्डरींग चॅम्पियन्सशीप

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,दिनांक २४ व २५ मे २०२४ रोजी शिवदुर्ग मित्र लोणावळा आयोजित करीत आहे दुसरी ओपन नॅशनल बोल्डरींग चॅम्पियन्सशीप स्पर्धा. प्रियदर्शनी संकुल लोणावळा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून विविध राज्यांतील १४० खेळाडू सहभागी होणार आहेत. सर्व तयारी पूर्ण झाली आहे आम्ही खेळाडूंची आतुरतेने वाट पाहत आहोत. स्पोर्ट्स क्लायंबींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व स्पोर्ट्स क्लायंबींग फेडरेशन ऑफ इंडिया ने सर्व तयारी चालू केलेली आहे. स्पर्धक यायला चालू झाले आहेत. शिवदुर्ग ची कामांची लगबग चालू आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शिवदुर्ग मित्र लोणावळाला प्रायोजक, तसेच काही वस्तू स्वरूपात तसेच काही सेवा स्वरूपात मदत केली आहे त्या सर्वांमुळे हि स्पर्धा यशस्वी होणार आहे. प्रमुख प्रायोजकांमध्ये मॅप्रो व डेला ॲडव्हेंचर हे असुन इतर सिंगींग रॉक , क्लिफ क्लायबंर, ऑरनामेंटल प्लॅंटस प्रा. ली, स्टेफिन ॲडव्हेंचर ,अटायर , ओंकार हॉस्पिटालीटी सर्विसेस,दर्शना परब , सियाद मोऊद्दीन , दीपक इन्स्टिटय़ूट ऑफ क्लायंबींग, विजय सुर्वे, दिनकर पिंपळे, चंद्रकांत बोंबले, उमेश तळेगावकर,अक्षय सरोदे , स्वच्छंद फाऊंडेशन, अभिजीत बर्मन (बॉंग दादा), रॉक एलीयंन्स, रुपेश गराडे, योगेश दळवी, वाय, सी , क्लासेस व लोणावळा नगरपरिषद लोणावळा. यां सर्वांच्या सहकार्याने हि स्पर्धा यशस्वी होणार आहे. या सर्वाचे मनापासून धन्यवाद. दोन्ही दिवस संपुर्ण दिवस स्पर्धा चालणार आहे. आपल्या वेळेनुसार अवश्य भेट द्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page