रेशन लाभार्थीना योग्य गुणवत्तेचे धान्य,दुकान पुर्ण वेळ खुले,दर्शनी भागात तक्रार पुस्तिका, धान्याचे नमुने सीलबंद पाकीटातच ठेवाव्यात -अशोक सब्बन,भारतीय जनसंसद

मावळ मराठा न्युज -रेशन दुकानांमध्ये योग्य गुणवत्तेचे धान्य, रेशन दुकान पूर्ण वेळ उघडे असणे, तक्रार पुस्तिका दर्शनी भागामध्ये लावणे, दुकानदाराने आरेरावीची भाषा न वापरता सौजन्याने वागणूक करणे, धान्याचे अद्यायावत साठ्याचे नमुने सीलबंद पारदर्शक पाकीटातच असावेत,तसेच ऑनलाईन अंगठे जुळत नसल्यामुळे धान्य मिळण्यात येणारे अडचणी या सर्व तक्रारीच्या निवारणासाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने जिल्हा पूरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देत असताना बुरूडगाव रोड येथील लाभार्थीसाठी सक्कर कारखान्या जवळ, स्टेशन रोड येथे असलेले दुकान क्रमांक २५ मधून वितरित झालेले निकृष्ट दर्जाचे धान्य हे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या टेबलावर त्याच्या निरिक्षणासाठी ठेवण्यात आले. सदर निवेदन देण्यासाठी अशोक सब्बन,कैलास पठारे, सुधीर भद्रे, अशोक भोसले, केशव बर्कते, सुनील टाकसाहेब,रईस शेख,वीरबहादुर प्रजापती, पोपटराव साठे, बबलू खोसला, बाळासाहेब पालवे,विजय शिरसाट, सुभाष शिंदे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जिल्हा अध्यक्ष सुधीर भद्रे म्हणाले बऱ्याच वेळा खाण्यास योग्य नसलेले धान्य व्यतिरिक्त केले जाते व लाभार्थ्यांना तेच धान्य घ्यावे लागते अशा निकृष्ट धान्याच्या वितरणामुळे रेशन लाभार्थीमध्ये प्रचंड चीड आहे त्यांनी तक्रारी केल्या असता त्याची दखल दुकानदार कडून घेतली जात नाही. वास्तविक पाहता निकृष्ट धान्य दुकानातून वितरित होऊच नये अशी व्यवस्था असतानाही दुकानदाराकडून निकृष्ट धान्याचे वितरण होत असते हे त्वरित थांबवण्यात यावे. अनेक रेशन दुकाने पूर्ण वेळ उघडे राहत नाही ठराविक वेळीच उघडे राहतात व अशा परिस्थिती रेशन लाभार्थींना रेशन घेण्यासाठी चक्रामाराव्या लागतात. ही दुकाने पूर्ण वेळ उघडे राहावीत असे शहराध्यक्ष रईस शेख यांनी सांगितले. या संदर्भात बुरुडगाव रोड येथिल नगरीकांनसाठी असलेले दुकान क्रमांक २५ हे शक्कर बिस्किट कारखान्या जवळ, स्टेशन रोड येथे असून या दुकानातून योग्य धान्य वितरित केले जात नाही निकृष्ट दर्जाचे धान्य असून ते खाण्यास अयोग्य आहे धान्य बदलून मिळण्याची मागणी केली असता रेशन दुकानदाराने आरेरावीची भाषा वापरून धान्य बदलून देण्यास नकार दिला तक्रार नोंदवण्यासाठी दुकानदाराकडे तक्रार पुस्तिका मागणी केली असताना तक्रार पुस्तिका ही मिळाली नाही. अशी माहिती भारतीय जनसंसदेचे रेशन विभागाचे प्रमुख केशव बरकते यांनी मांडली. गुणवत्तापूर्ण धान्य मिळणे, दुकान पूर्ण वेळ उघडे असणे, पुस्तिका दर्शनी भागात सर्व नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने लावणे,धान्याचे अद्यायावत साठ्याचे नमुने सीलबंद पारदर्शक पाकीटातच असावेत,दुकानदाराने सौजन्यपूर्ण वागणूक ठेवावी या मागण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना भारतीय जनसंसदेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page