वन्यजीव रक्षक संस्था, मावळचे संस्थापक निलेश गराडे यांना मावळचे आमदार सुनील शेळके यांचे नाव घेऊन निनावी धमकीचा फोन



मावळ मराठा न्युज :-तळेगाव,वन्य जीव रक्षक संस्था मावळ चे संस्थापक निलेश गराडे यांना दोन वेगवेगळ्या नंबर वरुन धमकीचे फोन पाण्यात बुडालेल्या मुलाला काढण्या साठी ऊशीरा गेलो व सोशल मिडिया वर बातमी का टाकली या कारणा वरुन धमकीचे फोन आले.तसेच आपले मित्र आमदार सुनिल आंण्णा शेळके यांचे नाव घेऊन पण धमकी दिली की त्यांना सांगुन तुझ्याकडे बघतो व तु कसा मावळ मध्ये काम करतो ? तुझे सगळे काम मि लगेचच बंद पाडतो व तु कुठे राहतो मला लगेच सांग मी तुझ्या कडे बघतो असे धमकीचे फोन दिनांक २७ मे बुधवार रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजे पर्यंत येत होते. पोलीसांनी कारवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आंदोलन करु अशी मागणी वन्य जीव रक्षक चे निलेश गराडे यांनी पोलिसांकडे केली आहे.




