योग आपल्याला शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन राखण्याची प्रेरणा देतो-कु.दिव्या शिर्के





मावळ मराठा न्युज -लोणावळा, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज दि. २१ जून २०२५ , रोजी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन विज्ञान सभागृहात केले होते या कार्यक्रमास महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी योग अभ्यासक कु. वृषाली आंदेकर व दिव्या शिर्के यांनी महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांना योगा बद्दल विशेष मार्गदर्शन केले, तसेच दिव्या शिर्के मॅडम यांनी ‘पतंजली योग’ या नावाविषयी पुरणातील दाखला देऊन विस्तृत माहिती सांगितली तसेच युग मन आरोग्य हे एकमेकांना पूरक कसे आहेत याविषयी सविस्तर चर्चा केली नंतरच्या सत्रात दुसरे योग अभ्यासक कुमारी वृषाली आंदेकर यांनी दैनंदिन जीवनात सोप्या योग साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची हमी प्राप्ती होते हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे उपस्थितांना पटवून दिले त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग यांच्याकडून प्रत्यक्ष वेगवेगळी आसने प्रात्यक्षिकाद्वारे करून घेतली, व आसनांचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. नरेंद्र देशमुख सर यांनी उपस्थितांना योगा बद्दल विशेष मार्गदर्शन करून व्याख्याते यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. सदर कार्यक्रम लोणावळा महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य डॉ. विलास पाटील सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन शिनगारे ( कार्यक्रम अधिकारी ) यांनी केले तर कार्यक्रमाची नियोजन प्रा. धनराज पाटील सर( कनिष्ठ विभाग कार्यक्रमाधिकारी) श्री राकेश साळुंखे, श्री रवींद्र उंबरे, श्री अनिकेत ढाकोड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.




