वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर तर्फे भीम अनुयायांना चहा,बिस्कीट व पाणी बॉटलचे वाटप



मावळ मराठा न्युज- लोणावळा,विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर वंचित बहुजन महिला आघाडी लोणावळा शहर यांस कडून चैत्यभूमीला अभिवादन करण्यास जाणाऱ्या भीम अनुयायांना रात्री नऊ ते दीड वाजेपर्यंत लोणावळा रेल्वे स्टेशन या ठिकाणी चहा,बिस्कीट व पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष लोकेश भडकवाड,भारतीय बौद्ध महासभा लोणावळा शहर अध्यक्ष राजेंद्र अडसुळे,कार्याध्यक्ष लोणावळा शहर संजय भाऊ कांबळे,प्रसिद्धीप्रमुख मावळ तालुका प्रवीण रोकडे,महासचिव लोणावळा शहर विशाल कांबळे,उपाध्यक्ष लोणावळा शहर रोहन कांबळे, उपाध्यक्ष लोणावळा शहर अब्दुल भाई शेख,कोषाध्यक्ष लोणावळा शहर मुरलीधर सरोदे,सहसचिव लोणावळा शहर रोहन गायकवाड,सल्लागार लोणावळा शहर अनिल धेंडे,संघटक लोणावळा शहर विशाल गायकवाड,संघटक लोणावळा शहर सुमित घोडके,संघटक लोणावळा शहरअभिजीत धांडोरे,संघटक लोणावळा शहर अनुज सरवते,संघटक लोणावळा शहर भीमसेन भालेराव, सदस्य प्रदीप सोनारीकर तसेच महिला कमिटी कडून अंजली कांबळे, नीता गायकवाड, रमा वाघे, मंगल आखाडे, वनिता भडकवाड, शर्मा मॅडम व काजल धांडोरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.




