लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये ” १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस “उत्साहात साजरा






मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये ” १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस ” आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिवसाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष, ऍड श्री राजेंद्र उमप, कैवल्यधाम योग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बंदिता सतपते, निवृत्त ब्रिगेडियर श्री सुहास धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व महिला वर्ग, कैवल्याधाम संस्थेतील अधिकारी वर्ग, लोणावळा शहरातील पत्रकार वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे राजेंद्र उमप यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरु केला याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या.योगा प्रोटोकॉल प्रमाणे कैवल्यधाम संस्थेच्या योगाचार्या श्रीमती संध्या दीक्षित यांनी उपस्थिताना योगाचे धडे दिले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील कार्ला लेणी व भाजे लेणी, MTDC कार्ला, देहूरोड कॉन्टोन्मेंट बोॅर्ड , लोणावळ्यातील L & T Traning Centre, INS शिवाजी येथे कैवल्यधाम संस्थेतर्फे योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले भाजे लेणी येथे संपर्क बालग्राम, भाजे येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच कैवल्य विद्या निकेतन शाळा, कैवल्यधाम यांनी लोणावळ्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण वर्गाचे विशेष आयोजन केले होते. १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच लोणावळ्यातील ऍड श्री संजय गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.




