कुमारी सायली शेळके यांचा अमेरिका या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार

मावळ मराठा न्युज- अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठी कुमारी सायली शेळके यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या या यशाच्या गौरवासाठी स्थानिक समाज कार्यकर्त्यांच्या तसेच श्री कॉलनी दिघी यांच्या पुढाकाराने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वीर यांनी सायलीला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात नम्रतेने सांगितले, “सायलीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रगती करत आपले ध्येय साध्य केले आहे. तिचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ती देशाचे नाव उज्ज्वल करणार आहे. विशेषत: एका युवतीने असे यश मिळवणे हे संपूर्ण समाजासाठी गौरवास्पद आहे.”कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले अंकुश मुळे, संजय शेळके, व्यंकट बाबळसुरे , बळवंत काळे, विकास शहाणे, रवी नांदे आणि ऋषिकेश जाधव यांनीही आपापले विचार व्यक्त केले. त्यांनी सायलीच्या यशाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व्यंकट बाबळसुरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले, “सायलीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देईल. तिच्या प्रयत्नांमुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि समाजाचा विकास होईल.”सत्कार समारंभात कुमारी सायली शेळके यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. तिला पुढील आयुष्यासाठी आणि शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. परदेशी शिक्षणासाठी मिळालेल्या संधीमुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण समाजालाही अभिमान वाटतो. या सत्कार समारंभात सायलीला पुढील शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती आणि सहकार्याच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page