आषाढी वारी,जाता पंढरीसी…सुख वाटे जीवा….- श्री संतोष गुरव



मावळ मराठा न्युज :- दि.४/०५/२०२४सुख, समाधान ही वृत्तीची संकल्पना आहे.परिस्थिशी त्याचा संबंध नसतो.परिस्थिती कशीही असो,तुमची वृत्ती सुखी असेल तर परिस्थितीत बदल होवू शकतो,होतो.वारकर्यांची वृत्ती विठ्ठल नामात सुख शोधणारी आहे.तिथे परिस्थिती आड येत नाही.हाफ तिकिटात पण जाता आलं असतं आषाढीच्या आधी एक दिवस लालपरीत बसून पण तिथे वारीतला भाव,नामजागर ही मजा नाही,हे सुख नाही.वर्हाडाच्या ट्रकात फाळक्यावर बसून प्रवासाची मक्तेदारी तरुणांची, इथे पंढरीराया वाटेवर मक्तेदारी चालते ती फक्त पांडुरंगाच्या ओढीची……मग संपतो स्री-पुरूष,उच्च-नीच,राव आणि रंकातला, सुखसुविधा – अडचणीतला भेदाभेद….सगळे फक्त वैष्णव…..वयोमानानुसार चालून आलेला थकवा दूर करण्यासाठी घेतलेल्या या अडचणीच्या दिसणाऱ्या प्रवासात पण मनाला सुखावह वाटणार्या जागेत पायांना मिळणारी विश्रांती फार मोलाची ठरते आणि फाळक्यावर बसण्याचा आनंद तो काय फक्त पुरुषांनीच घ्यायचा? दिवस सगळ्यांचेच येतात फक्त योग्य संधीची वाट पहावी लागते.आणि संयमाचे दुसरे नाव नारीशक्ती.दडवंत आहे या माऊलींना,रामकृष्ण हरी छायाचित्र- प्राचार्य शशिकांत साबळे,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पिंपरी चिंचवड पुणे




