लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न









मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाचा पदग्रहण समारंभ मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी हॉटेल चंद्रलोक, गवळीवाडा, लोणावळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.नवनिर्वाचित अध्यक्ष लायन मंगेश कदम, सचिव लायन राजेश राजपूत आणि खजिनदार लायन रोहित थोरात यांचा शपथविधी एमजेएफ लायन गिरीश मालपाणी यांच्या हस्ते पार पडला.त्यानंतर त्यांनी लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाच्या लायनिस्टिक वर्ष २०२६-२७ चा पदभार स्वीकारला.पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष लायन मंगेश कदम यांच्या हस्ते सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. नरेश खोंडगे यांना ‘सेवा सद्भावना पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी मागील लायनिस्टिक वर्षातील उत्कृष्ट कार्याबद्दल विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. लायन कांता ओसवाल यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट’, लायन निराली नाळेकर यांना ‘बेस्ट सेक्रेटरी’, लायन अश्विनी कदम यांना ‘बेस्ट ट्रेझरर’, एमजेएफ लायन देवल पारेख यांना ‘बेस्ट झोन चेअरमन’ तसेच PDG MJF लायन गिरीशजी मालपानी व लायन कांता ओसवाल यांनी लायन डॅा पोपट ओसवाल यांना ‘लायन्स ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व लायन निराली नालेकर यांना बेस्ट सेक्रेटरी व बेस्ट Anchoring पुरस्कार देण्यात आला या पदग्रहण समारंभास लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाचे चेअरमन तसेच क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



