पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा ने केला सरकारचा जाहीर निषेध



मावळ मराठा न्यूज़ ,वडगाव, मावळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाला अखेर राज्य सरकारच्या निर्णयामुळे अपयश आले आहे शिवसेना ही पहिल्यापासुन पवना बंद जलवाहिनी विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे आजही आणि यापुढेही उभी आहे शिवसेनेची बांधिलकी बांधावरील शेतकऱ्यांशी आहे, या बंदिस्त जलवाहिनी साठी मावळ तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले आहे त्या शेतकऱ्यांचे बलिदान शिवसेना कदापी व्यर्थ जावू देणार नाही .राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा व मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना व तमाम मावळवासियांना न्याय मिळवून द्यावा.अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही याची राज्य सरकारने दखल घेऊन हा प्रकल्प कायमस्वरूपी तालुक्यातून हद्दपार करावा अशी मागणी आज उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने मावळ चे तहसीलदार श्री विक्रम देशमुख यांना निवेदनाद्वारे शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक मदन शेडगे, तालुका संघटक अशोक निकम, तालुका सल्लागार मारूती खोले, सल्लागार रमेश जाधव, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, उपतालुकाप्रमुख डाॅ विकेश मुथा, तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, समन्वयक काळु हुलावळे, अनिल भालेराव, तळेगाव दाभाडे शहरप्रमुख शंकर भेगडे, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, उपशहरप्रमुख संजय भोईर,विभाग प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, विभाग प्रमुख उमेश दहिभाते, विभाग प्रमुख नितीन पिंगळे, विभाग प्रमुख भरत भोते, विभाग प्रमुख उत्तम तरस, युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, मा शहरप्रमुख गणेश भोकरे,मा शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे, उपविभाग प्रमुख संदिप झांबरे, उपविभाग प्रमुख राहुल दवणे, उपविभाग प्रमुख सचिन ढोरे, दत्तात्रय नाटक, बाळासाहेब शेलार, शंकर गोपाळे, इंदोरी मा सरपंच नवनाथ पडवळ, सुरेश गुप्ता, मा शाखाप्रमुख प्रकाश चव्हाण, शाखाप्रमुख किशोर कालेकर, शाखाप्रमुख रूपेश आंबेकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




