३५ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर आदर्श पर्यवेक्षिका शामला रामचंद्र पंडित सेवानिवृत्त

मावळ मराठा न्युज – देहूरोड -पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये सन १९९२ पासून निमगाव केतकी,, नसरापूर, कापूरहोळ,पानशेत, कामशेत, चऱ्होली, मोशी, चिखली, आकुर्डी इ. शाखांमधून ३४ वर्ष अध्यापन करीत श्री शिवाजी विद्यालय देहुरोड येथे पर्यवेक्षिका पदभार सांभाळून ३१ आक्टों २०२६ ला सेवानिवृत्त झाल्या .शामला रामचंद्र पंडित यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीमुळे, विषयावरील प्रभुत्वामुळे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीमुळे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा निकाल दरवर्षी १००% लागण्यात मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचा हा प्रवास म्हणजे निष्ठा, परिश्रम आणि समर्पणाचा एक दीपस्तंभ आहे.शिक्षणाकडे केवळ एक कर्तव्य म्हणून पाहिले नाही, तर तो एक यज्ञ मानला. सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध, वकृत्व, नाट्यस्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेऊ वेळोवेळी सन्मान प्राप्त करून दिले नाट्यसंहिता त्या स्वतः लिहीत असत .सकाळ नाट्यवाचनामध्ये पुरस्कार प्राप्त झाले होते . सन २०१९ – २० ऑनलाइन विजेता महाराष्ट्राचा भाषण स्पर्धेत विद्यार्थी विजेता म्हणून निवड झाली. क्रीडा स्पर्धा , विद्यार्थ्यांना समुपदेशन ,विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, अडीअडचण सोडविण्यास मार्गदर्शन केले .कर्तव्यनिष्ठा, हसतमुख स्वभाव, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, एक मार्गदर्शक, मित्र आणि तत्त्वज्ञ म्हणून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले. आपली ही पोकळी शाळा कधीही भरून काढू शकणार नाही.शाळेचा एक मजबूत स्तंभ त्या होत्या. त्यांची शिस्त, वेळेचे भान आणि अध्यापनातील समर्पण वृत्ती येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.पिंपरी चिंचवड गुणवंत शिक्षक पुरस्कार,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्था आदर्श शिक्षक पुरस्कार,महिला दिन विशेष सन्मान,काव्य सादरीकरणाचे सन्मान, विद्यार्थी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य यांचेकडून सन्मान. नक्षत्राचे देणे ओझर येथे संमेलन चित्र काव्य स्पर्धा द्वितीय क्रमांक ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार – ऑगस्ट २०२५, दिलासा साहित्य समूह पिंपरी चिंचवड ,सकाळ नवदुर्गा सन्मान – २०२५,शिक्षण संजीवनी पुणे यांचा महिला दिन विशेष सन्मान २०२६ यासारखे महत्वपूर्ण सन्मान त्यांना लाभले, त्यांनी मायबोली मराठीचा लळा आणि जिव्हाळा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.मातृभाषा अध्यापक संस्था , पुणे , कार्यवाह म्हणून त्या कार्यरत आहेत . आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की,”माझ्या यशामध्ये माझे आई-वडील, बहिण -भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे.शिक्षक पेशा माझ्यासाठी केवळ नोकरी नव्हती तर ते माझे जीवन होते. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यांमुळेच मी माझी सेवा यशस्वीपणे पूर्ण करू शकले. निवृत्त झाले तरी शिक्षणाचा हा ध्यास कायम राहील.”सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा व साहित्य सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे.या कार्यक्रमाला कुटुंबातील व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.पु . जि . शि . मं .संख्या कार्यालय मा . संतोष पठारे, क्रीडा विभाग मा. शाम भोसले, निवृत्त शिक्षणाधिकारी श्री कल्याण पानगे,निवृत्त मुख्या .गोरे सर, आहेर सर, रोकडे सर,मोरे सर , रजनी अहेरराव ,मुख्या .निवेदिता पानसरे , मुख्या .शारदा सस्ते, मुख्या. जमदाडे सर, आल्हाट सर, घरबुडे मॅडम, कोकणे मॅडम, इ.नि मनोगत व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page