लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक झालेल्या तरुणीला राष्ट्रीय समाज सहाय्यक समितिमुळे मिळाला न्याय

मावळ मराठा न्युज :- तळेगाव,लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक राष्ट्रीय समाज सहाय्यक समिति कडून आज रोजी १९/७/२०२४ रोजी तरुणीस कायदेशीर न्याय मिळवून देण्यात यश मिळाले.नाशिक, मालेगाव, सटाणा लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तेथील तरुणीची फसवणूक करून शारीरिक जवळीकता साधली. त्याच आधारे त्याने त्या तरुणीस ब्लॅकमेल करून पुढील संबंध ठेवण्यास भाग पाडले तसेच त्याचे पहिले लग्न झालेले असुन देखील त्याने दुसरे लग्न करण्यास तिला भाग पाडले. काही दिवसांनंतर त्याच्या पहिल्या पत्नीस समजताच त्याने त्याच्या पहिल्या पत्नीस घेऊन त्याच्या मुळ गावी पलायन केले.तदनंतर त्या तरुणीने त्याच्या मुळ गावी शोध घेऊन पोलीस केस करण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही. त्यांनतर ती तरुणी राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीकडे मदत घेण्यास आली. तेव्हा समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अर्चना म्हाळस्कर थिटे यांनी सर्व प्रथम तिचे समुपदेशन करुन मानसिकतेने पुर्ण शांत करुन पोलिसांबद्दलचा गैरसमज दूर केला.व त्या तरुणास, त्याच्या घरच्यांना निरोप देण्याकरता फोन केला परंतु काही न समजल्यामुळे समाज सहाय्यक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व अधिकारी हे नाशिक चे सीपी, आयजी श्री दत्तात्रय कराळे , एसपी ऑफिस , डी वाय एस पी नितीन गणपुरे यांची भेट घेऊन तरुणाच्या गावी सटाणा येथील पोलिस ठाण्यात गेलो तेथील पोलीस निरीक्षक यांनी सर्व केस समजून घेऊन त्या तरुणास व त्याच्या घरच्यांना बोलावले. तदनंतर अतिशय योग्य रीत्या त्या तरुणावर कायदेशीर कारवाई केली त्या तरुणाच्या विरोधात योग्य ते गुन्हे दाखल करुन तळेगाव दाभाडे येथे तो गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यामुळे तरुणीस न्याय मिळवून देण्याबाबत मदत केली. तसेच त्या अबला तरुणीस व तिच्या घरच्यांना राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या अध्यक्ष अर्चना म्हाळस्कर थिटे ,समितीचे राष्ट्रीय अधिकारी पि एम सैनीजी , मीनाक्षीजी यांच्या कडून न्याय मिळाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page