गवळीवाडा,शाळा क्रमांक ६ मधील वारकरी वेशभूषा मध्ये चिमुकल्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्यूज़, लोणावला, आज दिनांक २७ जून रोजी गवळीवाडा, शाळा क्रमांक ६ मध्ये दिंडी सोहळा उपक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला. शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषा मध्ये सहभागी झाले होते पालखीची सुरुवात शाळेच्या आवारातून ते श्री राम मंदिर गवळीवाडा येथे विठ्ठलाच्या गजरात नेण्यात आली. श्रीराम मंदिराच्या समोर छोट्या वारकऱ्यांनी अतिशय सुंदर असे रिंगण घातले त्याचबरोबर फुगड्या खेळल्या गेल्या. आपल्या महाराष्ट्र राज्याची भूमि ही अनेक संतांची आहे ही परंपरा कशी जपली जाते याचे महत्त्व श्री अमोल साबळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच या पालखी सोहळ्यामध्ये शाळेतील श्री प्रभाकर पवार , मनीषा सरोदे तसेच शीतल येणारे श्री अमोल साबळे , मुख्याध्यापिका नंदा तांदळे, सर्वजण विद्यार्थ्यांच्या बरोबर हे सर्व शिक्षक सहभागी होते. विशेषतः या छोट्या वारकऱ्यांना दीपक शिर्के व परिवार यांनी अल्पोहार दिला. त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व शिर्के परिवाराचे खूप खूप आभार मान न्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page