हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोणावळा शहराला वैकुंठ रथाचे लोकार्पण




मावळ मराठा न्यूज;-लोणावळा,हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री जैन श्र्वेतांबर मूर्तिपूजक देवस्थान ट्रस्ट लोणावळा,हिंदू समिती लोणावळा व ग्रामीण परिसर यांच्या सहकार्याने लोणावळा शहरासाठी वैकुंठ रथाचे लोकार्पण आणि मावळ तालुका मर्यादित भजनी मंडळ स्पर्धा आणि त्यांतील विजेत्यांना माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक ॲड विजयराव दाभाडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,लोणावळा नगरीचे मुख्याधिकारी पंडित पाटील,श्री जैन श्र्वेतांबर मूर्तिपूजक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश चौहान,लोणावळा सहकारी बँकेचे मुकुंद शहा,वारकरी सांप्रदाय मंडळाचे मावळ तालुका अध्यक्ष नंदकुमार भसे,कार्याध्यक्ष संतोष कुंभार,हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख, ॲड संजय वांद्रे,विभावरी दाभाडे,दत्तात्रय येवले,कैलास भेगडे,दत्तात्रय कांदळकर,बिंद्रा गणात्रा व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित सर्व नगरसेवक,नगरसेविका,हिंदू समितीचे पदाधिकारी जैन देवस्थानचे पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संजय भेगडे यांच्या हस्ते आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले.तर भजनी मंडळातील विजेत्यांना पारितोषिके पाहुण्यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.यावेळी वारकरी संप्रदायातील परंपरेनुसार टाळ मृदुंगाच्या नाद करण्यात आला.यावेळी ॲड रवींद्र दाभाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले,संस्थेच्या वतीने दत्ताभाऊ येवले यांनी प्रास्तविक केले तर अध्यक्षीय भाषणात बाळा भेगडे यांनी वारकरी यांचे साठी देहू,आळंदी,भंडारा डोंगर आणि पंढरपूर या वारकरी यांच्या पुण्यभूमी सुरू असलेल्या कोट्यवधी विकास कामांची माहिती दिली.सुरेखा जाधव यांनी नगरपालिकाच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती दिली नंदकुमार भसे यांनी वारकरी संप्रदाय बद्दल भजनी मंडळाचे कौतुक केले तर मुख्याधिकारी यांनी हिंद विजय नागरी पत्संथेला शुभेच्छा दिल्यात.




