८ हजार १५ कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या साखर आयुक्ताची हाकलपट्टी करा ;-विठ्ठल पवार राजे


मावळ मराठा न्यूज :-“एफ आर पी न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, साखर साखर आयुक्ताचे निषेधार्थ साखर आयुक्तालय अथवा सेंटर बिल्डिंग वरून २० मे रोजी २० शेतकरी उड्या मारणार.राज्यात शेतकऱ्यांना १०० टक्के एफ आर पी मिळालेली नाही! एफआरपीत ८००० हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. “दोन २ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला साखर आयुक्त साखर कारखान्याचे चेअरमन जबाबदार आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. २२-२३ चे गाळप हंगामात FRP आणि H&T मध्ये, टक्केवारीची हेरा फेरी करत ८ हजार १५ कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या साखर आयुक्ताची हाकलपट्टी करा, गत दोन दोन वर्षातील गाळप हंगामामध्ये (२१२२ व २२२३ ) पंधरा ते सोळा हजार कोटीचा घोटाळा, घोटाळ्यामध्ये साखर आयुक्तालय बरबटलेले असल्याने साखर आयुक्तांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची CBI, ACB, अथवा ED मार्फत चौकशीचे आदेश द्या.शनिवार दिनांक 20 मे रोजी पुणे येथील बुधाजीराव मुळीक यांनी आयोजित केलेल्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास,. “महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री आदरणीय नारायणजी राणे साहेब आणि सर्व सामान्यांचे राजे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज खासदार यांनी साखर आयुक्तांचा सत्कार करू नये, माननीय यांना ही विनंती आहे महाराष्ट्रातील शेतकरी एफ आर पी मिळालेली नाही म्हणून आत्महत्या करत असताना त्या पदावर असलेल्या व शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा सन्मान करणे तुम्हाला शोभते का.? कृषी भूषण यांना विनंती आहे की शनिवार दिनांक २० मे रोजी चा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रद्द करा!, शेतकऱ्यांना एफआरपी साठी आत्महत्या करायला लावणाऱ्या साखर आयुक्त ची हकलपट्टी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे, सहकार मंत्र्यांकडे, कृषी मंत्र्यांकडे शिफारस करा. अन्यथा संघटनेचे २० कार्यकर्ते, शनिवार दिनांक २० मे २०२३ ला साखर आयुक्तालय, किंवा सेंट्रल बिल्डिंग वरून उड्या मारणार. विठ्ठल पवार राजे यांनी इशारा दिला आहे.




